SNDT University sakal
मुंबई

SNDT University : एसएनडीटी विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन : कुलगुरूंची घोषणा

SNDT University : एसएनडीटी विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन होणार असून, त्यांच्या सृजनशीलतेचा अभ्यास करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल, असे कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी जाहीर केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने  श्रीमती नाथिबाई ठाकरसी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) अध्यासन केंद्र उभे केले जाणार असल्याची घोषणा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आज केली. यासोबत विद्यापीठात महर्षी धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावानेही अध्यासन केंद्र स्थापन केली जाणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

विद्यापीठात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोक कल्याणकारी सुशासन या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील दुसऱ्या सत्रात 'सृजनशील अहिल्या' या विषयावर  कुलगुरू बोलत होत्या. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पद्मश्री  निवेदिता भिडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. देविदास पोटे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. चक्रदेव पुढे म्हणाल्या,अहिल्यादेवी होळकर या महिलांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सुशासन करताना मनात वैर न ठेवता केले. आणि त्या ठेवता कला प्रेमही जपले. त्यांच्याकडून किती शिकायचे , असा प्रश्न पडतो. त्यांची सृजनशीलता ही अभियंता म्हणूनच नव्हे तर त्या एक कलाप्रेमी, शिवभक्त म्हणूनही तितकीच होती. त्यांनी महेश्वर येथे देशातील कलावंत यांना आणले. हातमाग  वस्ती वसवली असल्याची माहितीही कुलगुरूंनी  दिली.

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात बांधलेली  मंदिरे, राजवाडे यांचे बांधकाम, त्यांनी मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार त्यातून  त्यांची अभियंता म्हणूनही एक मोठी कुशलता होती. ते आजही आपल्याला अनेक  देवळातून ते दिसते., त्यामुळे त्यांच्यात कलाप्रेमी, शिवभक्त आणि अभियंता म्हणून जी सृजनशीलता होती, त्याचा अभ्यास व्हावा, यासाठी विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन केले जाणार  असल्याचे कुलगुरू डॉ. चक्रदेव यांनी यावेळी सांगितले.

पद्मश्री निवेदिता भिडे म्हणाल्या,अहिल्याबाई या केवळ धार्मिक नव्हे तर व्यावहारिक देखील होत्या. त्या आपल्या ध्येयाला सुसंगत असे जगल्या.रयतेला सुखी ठेवणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या काळात प्रत्येक लोकांना आपल्याला तक्रार करण्याची मुभा होती.आणि त्या सती प्रथा बंद करण्यासाठी त्या यशस्वी ठरल्याचे भिडे यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक देविदास म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या स्त्री शक्तीचा एक मोठा आविष्कार होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अहिल्याबाईंनी चालवला. बनारस येथील मंदिर जीर्णोद्धाराच्या अधुरे राहिलेले काम त्यांनी पूर्ण केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

जुहू संकुलात उभे राहणार म्युझियम

सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र हे विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलात स्थापन केले जाणार आहे . तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासून अहिल्यादेवी होळकर आदीची वेगळी ओळख आणि माहिती मिळावी यासाठी विद्यापीठाच्या जुहू संकुलात  डिजिटल म्युझियम उभे केले जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार; सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

Jalna News: अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका; शेतकरी संकटात; धाकलगाव परिसरातील चित्र

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

SCROLL FOR NEXT