मुंबई

लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास पोलिसांकडून जबर कारवाई! वाचा किती गुन्ह्यांची नोंद झाली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान कलम 188 नुसार राज्यात आतापर्यंत 49 हजार 756 गुन्हे दाखल झाले. या प्रकरणांत 10 हजार 276 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जारी केलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न गुन्हेगार व समाजकंटक करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरोधात कठोर पाऊले उचलून राज्यात 227 गुन्हे दाखल केले आहेत. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत राज्यातील पोलिस ठाण्यांत आठ अदखलपात्र गुन्ह्यांसह 227 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 

या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 555 व्यक्तींना पोलिसांनी शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याच्या 102 घटनांची नोंद झाली असून, 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT