Bhaskar Jadhav Team eSakal
मुंबई

Dasara Melava : "...तर बीकेसीवर कचरा मेळावा सुरुए"; भास्कर जाधवांकडून शिंदे गटावर निशाणा

शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवतीर्थावर सध्या खुद्दारांचा मेळावा सुरु आहे तर बीकेवर कचरा मेळावा सुरु आहे, अशा कठोर शब्दांत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिवाजी पार्क मैदानावर आज उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा सुरु आहे.

भास्कर जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी आपल्या उतारवयात आमच्यासमोर वचन घेतलं आम्हाला विनंती केली की, माझं आता वय झालय तुम्ही माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. पण त्याच उद्धवना आम्ही गादीवरुन खाली खेचलं.

अरे ती माय माऊली तळमळली तिच्या आत्म्याला पिळ पडला आणि तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की जा आज या सत्तेला तुम्ही काय नाव दिली. त्या मायमाऊलीला तुम्ही सांगितलं की आमची शिंदेशाही आहे. पण ती माय माऊली हळूच म्हणाली ही शिंदेशाही नाही मोगलशाही आहे, अशा शब्दांत शिंदे गटावर त्यांनी निशाणा साधला.

पत्रकार मला कालपासून विचारत होते. दसरा मेळावे दोन आहेत पण मी म्हणालो की दसरा मेळावा तर शिवतीर्थावर आहे तर बीकेसीतला कचरा मेळावा आहे. खुद्दारांचा मेळावा इथं होतोय तिथं तर गद्दारांचा मेळावा होतोय. स्वतःची चटणी भाकरी खाऊन लोक इथं आलेत. उद्धव ठाकरेंना पाठींबा द्याला आलेत तर तिकडे पन्नास खोकेवाले आलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: ३७ चौकार-षटकार… वर्ल्ड कप नॉक आऊटमधील सर्वोच्च धावसंख्या... संजू सॅमसनने हिटमॅन रोहितचा विक्रम मोडला, भारताचे ७ जबरदस्त विक्रम...

Latest Marathi News Update : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना

विद्यार्थ्यांसमोरच राडा! पालक सभेत शिक्षक-पालकांत उफाळला वाद; शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक रखडली

Pune Crime : पुणे मेट्रोसाठी गुंतवणुकीचे आमिष दाखवून दाम्पत्याला तब्बल ३ कोटी ७८ लाखांचा गंडा, दोघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT