समाजमाध्यम ठरतंय ‘दोघांत तिसरा’! 
मुंबई

समाजमाध्यम ठरतंय ‘दोघांत तिसरा’!

महेंद्र दुसार

अलिबाग ः मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे ‘जग जवळ आले’ असे म्हटले जायचे. मात्र हळूहळू या साऱ्या गोष्टी स्वस्त आणि आवाक्‍यात आल्यानंतर वापरकर्ते अक्षरशः त्यांच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे ‘मोबाईल हेच आपले जग’ अशा मानसिकतेत जगणाऱ्यांचे कौटुंबिक वाद वाढत चालले आहेत. अशा वादांतूनच ३० टक्के घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घरापासून दूर असताना कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी फायदेशीर ठरणारा मोबाईल अनेकांना घरात कुटुंबासोबत असतानाही सोडवत नाही. काहीच कारण नसताना मोबाईलवर तासन्‌तास घालवताना घरच्यांशी संवादच होत नसल्याचे दिसते. व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे पती-पत्नींमध्येही दुरावा वाढत चालला आहे. 

अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेले भांडण व्हॉट्‌सॲपवरील चॅटिंग, कॉल रेकार्ड, छायाचित्रे आदी पुरावे गोळा करण्यापर्यंत पोहचते आणि त्या आधारे गंभीर गुन्ह्यांची पातळी गाठली जाते. अशी अनेक प्रकरणे जिल्हा न्यायालयात निवाड्यासाठी येत आहेत, असे पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्षाच्या निरीक्षक संगीता बोचरे-पाटील यांनी सांगितले.

महिला आणि बालकल्याण विभागाचा ‘सखी’ विभाग, कौटुंबिक न्यायालयाद्वारे कौटुंबिक वाद मिटवण्याचे प्रयत्न केले जातात; मात्र मोबाईलच्या वाढत्या वापराने हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, असे बोचरे-पाटील यांनी सांगितले.

तरुण दाम्पत्यांमध्ये संशयी वृत्ती वाढली आहे. याला समाजमाध्यमांमुळे खतपाणी मिळते. त्यातून पती-पत्नींत वाद निर्माण होतात. यात मोबाईल हा कळीचा मुद्दा ठरतो. हे टाळण्यासाठी नव्या पिढीला सजग करणे आवश्‍यक आहे.
- डॉ. ॲड. निहा राऊत, समुपदेशक, मध्यस्थी केंद्र

समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक व्हायला हवा. समुपदेशनाने यातील काही प्रकरणे सुटत असली, तरी ती तात्पुरत्या स्वरूपाची असतात. वादातून दोघांनाही एकमेकांपासून तत्काळ सुटका हवी असते. यातून अनेक संसार मोडत आहेत. हे समाजहितासाठी धोक्‍याचे आहे.
- ॲड. मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्ष, अलिबाग नगरपालिका

पती-पत्नींमधील विश्‍वासाचे नाते हरवत चालले आहे. मोबाईलच्या साह्याने एकमेकांविरोधात पुरावे शोधले जातात. समुपदेशनानंतरही खदखद कायम असते. कौटुंबिक कलहात ३० टक्के वादाला मोबाईल कारणीभूत ठरत आहे. हे वाढते प्रमाण धोक्‍याचे आहे.
- संगीता बोचरे-पाटील, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस मुख्यालय, अलिबाग.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT