Diva City Traffic Sakal
मुंबई

Diva News : वाहतूक कोंडी सोडवा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरुन ती सोडवू - मनसेचा इशारा

दिवा शहरातील दिवा चौकात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत सायंकाळी ७ ते रात्री ९ या काळात तर इथे तासभर वाहनांच्या रांगा लागतात.

सकाळ वृत्तसेवा

दिवा - दिवा शहरातील दिवा चौकात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत सायंकाळी ७ ते रात्री ९ या काळात तर इथे तासभर वाहनांच्या रांगा लागतात. दिवा स्टेशन कडून शीळ फाटा आणि आगासन कडे जाणारी व येणारी वाहने या चौकात येऊन कोंडीत अडकतात. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीसाची नेमणूकीची मागणी दिवा मनसेने केली आहे.

दिव्यातील चौकात दिवा स्थानकातून, शीळ मार्गावरुन, आगासन- बेडेकर नगरवरुन रिक्षा, दुचाकी तर चार चाकी येतात. अन् त्याचवेळी त्या चौकात नवी मुंबई, डोंबिवली आणि ठाण्यावरुन येणाऱ्या बसेसमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. तर तेथे संध्याकाळच्या वेळी वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने कोणीही कशाही गाड्या दामटवून संपूर्ण वाहतुकीचा बोजवारा उडवून देतात.

अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस उपलब्ध असल्यास दिवा चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीला चाप बसेल, असे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी दिवसा येऊन वाहनांवर कारवाई करून जातात.

पण संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेस वाहतुकीचे नियमन करण्यासाठी किमान रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक पोलीस दिव्यात असणे गरजेचे आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत ही वाहतूक कोंडी जीवावर देखील बेतू शकते याकडे दिवा मनसेने वाहतूक पोलीसांचे निवेदनातून लक्ष वेधले आहे.

जर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस उपलब्ध होत नसतील, अन् त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीने उग्र रुप घेतल्यास मनसेचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून दिवा चौकातील वाहतूक कोंडीची नियमन करतील, असा इशारा मनसेने या निवेदनातून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT