म्हाडा Gallery
मुंबई

दक्षिण मुंबईतील 67 घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत

750 ते 1200 चौरस फुटाची घरे : नवीन वर्षात निघणार सोडत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घरे उपलब्ध नसल्याने यंदा म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत निघाली नाही. परंतु आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मुंबई मंडळ सोडत काढण्याच्या विचारात आहे. या सोडतीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाकडून (आर आर मंडळ) मिळालेल्या दक्षिण मुंबईतील 67 घरांचा समावेश होणार आहे. ही घरे आर आर मंडळाने मुंबई मंडळाला दिली असून सुमारे 750 ते 1200 चौरस फुटाची ही घरे मुंबईकरांना बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणार आहेत.

सध्या म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 8 हजार 984 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या सोडतीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. कोकण मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जाची संगणकीय सोडत 14 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर मुंबई मंडळ सोडत काढणार आहे. या मुंबई मंडळाकडे यंदा घरे नसल्याने सोडत काढण्यात आली नाही. मात्र पुढील वर्षी पहाडी गोरेगाव येथील पहिल्या टप्प्यातील उपलब्ध होणाऱ्या घरांची सोडत काढण्याची मंडळाची तयारी सुरु आहे. गोरेगाव येथील ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.

याशिवाय विविध ठिकाणची विखुरलेली घरेही या सोडतीमध्ये असतील. तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाकडून उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासातून मिळालेली अतिरिक्त घरे मुंबई मंडळाला सोडतीसाठी देण्यात येतात. त्यानुसार पुढील सोडतीसाठी सुमारे 67 घरे मुंबई मंडळाला देण्यात आली आहेत. सुमारे 750 ते 1200 चौरस फुट आकाराची ही घरे मध्यम ते उच्च उत्पन्न गटांसाठी असणार आहेत. मात्र बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाची घरे कित्येक पटीने कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याने या घरांसाठी मोठी चुरस पाहण्यास मिळणार आहे.

मुंबई मंडळाचा सोडतीसाठी घरे दिली आहेत. ही घरे 750 ते 1200 चौरस फुटाची आहेत.

- अरुण डोंगरे - मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

Pune Fraud News : गृहप्रकल्पाच्या नावाखाली ५० कोटींची फसवणूक! व्यापारी व निवासी सदनिका देण्याचे आमिष; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

Pune News : अर्थव्‍यवस्‍थेचा विकास हा आकड्यांचा खेळ; माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

SCROLL FOR NEXT