मुंबई

मुंबईत स्पेशल 26 स्टाईलने फसवणुकीचा प्लॅन; तोतया सीबीआय अधिकारी अटकेत

मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी चार आरोपींना फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी चार आरोपींना फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे.

मुंबई - मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी चार आरोपींना फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. विशेषतः हे चार आरोपी बॉलीवूड चित्रपट स्पेशल 26 द्वारे प्रभावित होऊन सीबीआय अधिकारी सांगत खाजगी कंपनीतून पाच लाख रुपये घेऊन फसवणूक करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेले आरोपी खऱ्या सीबीआयप्रमाणे छापा टाकण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीतून कोठेही जायचे आणि फसवणूक करून पळून जायचे. जीव अर्जुन हरी, गिरीश श्रीचंद वालेचा, मंगल फूलचंद पटेल, किशोर शांताराम चौबळ, अशी अटक आरोपींची नावे असून याशिवाय आणखी ५ आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

थोडक्यात हकीकत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील एका खाजगी कंपनीत काही जणांनी कोटय़वधींचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कंपनीत गेले आणि कर्जाच्या बदल्यात लाखोंचे कमिशन मागितले. सौदा निश्चित होताच, आणखी काही लोक तेथे पोहोचले आणि स्वतः सीबीआय अधिकारी असल्याची ओळख सांगत पाच लाखांची मागणी करू लागले. एकंदरीत फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यानंतर तक्रारदाराने गोरेगाव पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांचा तपास

घटनास्थळी पोहोचतच चौकशी गोरेगाव पोलिसांनी सुरू केली असता कंपनीतीलच तिघांना अटक केली परंतू एक आरोपी पळून गेला. पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेत घा जवळच्या परिसरातून अटक केली आणि त्याच्याकडून पाच लाख रुपये जप्त केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलीस आणि सीबीआयची बनावट ओळखपत्रेही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने यापूर्वीही सीबीआय, पोलिस आणि कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.या टोळीतील आणखी काही आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT