मुंबई

मध्य रेल्वेने उघडली जोरदार मोहिम; 'या' पाचही विभागात राबवण्यात येणार विशेष अभियान

प्रशांत कांबळे


मुंबई  : स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वे मार्गावरील पाच ही विभागात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यादरम्यान रेल्वे स्थानक, रूळ, कार्यशाळा, वर्कशॉप, कोचिंग डेपो, शेड, रेल्वे वसाहती आणि रेल्वे परिसरातील स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.

 मुंबई विभागः

मुंबई विभागात स्वच्छता  मोहिमेद्वारे ट्रॅकची स्वच्छता, मलबा, जंगली वनस्पती साफ करणे, प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटींग क्षेत्र साफ करणे आणि कोचिंग डेपो, कार्यशाळा साफ करणे यावर भर देण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे रुळ, प्लॅटफॉर्म व स्टेशन परिसराची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीच्या मागील बाजूचे व प्लॅटफॉर्म क्रमांक 18 येथील व्हीआयपी साइडिंग क्षेत्र तसेच मलबा साफ करण्यात आले.  माटुंगा व सानपाडा कार्यशाळांमध्येही साफसफाईचे काम करण्यात आले.

 भुसावळ विभाग

 भुसावळ विभागाच्या विविध कोचिंग डेपो व शेडमध्ये स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.  भुसावळ येथील बीटीसी कॉम्प्लेक्स व अमरावती आणि  चाळीसगाव येथील कोचिंग डेपोमध्ये साफसफाईची कामे करण्यात आली. त्याशिवाय विविध ठिकाणी सफाईचे काम तसेच मलबा साफ करण्याचे कामही करण्यात आले.

सोलापूर विभाग

 सोलापुरात जंगली वनस्पती स्वच्छ करणे, मलबा हटविणे आणि कॅरेज साईडिंग साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले.  वाणिज्य विभागातील कर्मचार्‍यांनी श्रमदान उपक्रम हाती घेतले होते ज्यात 72 हून अधिक तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले होते.  पंढरपूर येथे ऑपरेटिंग, वाणिज्य, इंजिनिअरिंग, चिकित्सा इत्यादी विभागांतील सुमारे 47 कर्मचार्‍यांनी रेल्वे वसाहती, रेल्वे परिसरातील उद्याने आणि स्टेशन इमारतीची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले. लातूर येथे रेल्वे रुळ व स्टेशन परिसराची सफाई करण्यात आली.  दौंड येथे  रेल्वेच्या रुळांच्या बाजूचे तृण आणि जंगली वनस्पती काढून टाकण्याचे काम करण्यात आले. वाडी, कलबुरगि, बेलापूर आणि साईनगर शिर्डी येथे नाले, स्टेशन परिसर आणि श्रमदान कार्य साफसफाईचे कामे करण्यात आली.

 पुणे विभाग

स्वच्छता मोहिमेमध्ये मध्य रेल्वेचा पुणे विभागही आघाडीवर होता, पुणे देखभाल यार्ड आणि कोचिंग डेपोमध्ये साफसफाईचे काम हाती घेण्यात आले.  पावसाळ्यात वाढलेली दाट झुडुपे साफ करण्याबरोबरच देखभाल करताना जमा केलेले जंक व स्क्रॅप साफ करणेही होते.  मिरज वस्तूंच्या शेडमध्ये, आतील स्टोअरचे क्षेत्र, प्रवेशद्वार आणि खुल्या शेड क्षेत्राची साफसफाई  आणि कचरा विल्हेवाट लावण्याच्या नियमांनुसार अत्यंत  कार्यक्षमतेने विल्हेवाट लावण्यात आली.  पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये परिसर स्वच्छ करण्याशिवाय दाट झाडे स्वच्छ केली गेली. वाणिज्यिक विभागातील कर्मचार्‍यांनी पुणे स्टेशनच्या आसपासच्या रेल्वे परिसरात श्रमदान उपक्रम राबविले.

नागपूर विभाग

नागपूर विभागातही विविध स्थानकांवर स्वच्छता करण्यात  आली. स्टेशन परिसरातील सर्व स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आले  तसेच नागपूर स्थानकावर विशेष  लक्ष देण्यात आले होते.  कंपाऊंड भिंतीच्या मागील बाजूचे आवार आणि परिसर स्वच्छ केले गेले.  वाणिज्यिक व कार्यालयीन कर्मचार्‍यांनी उंच दरवाजे व खिडक्याही स्वच्छ केल्या.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT