मुंबई

अकरावी प्रवेशाची आणखी एक विशेष फेरी, 5 जानेवारीला जाहीर होणार गुणवत्ता यादी  

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 2 : मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात आली आहे. यानंतरही तब्बल 1 लाख 7 हजार 36 जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशासाठी अर्ज केलेले सुमारे 25 हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून दूर आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी आता दुसरी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या फेरीची गुणवत्ता यादी 5 जानेवारीला जाहीर होणार आहे. 

अकरावी प्रवेशासाठी यंदा 3 लाख 20 हजार 390 जागांसाठी 2 लाख 12 हजार 152 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीवेळी अर्ज दाखल केले होते. शिक्षण विभागाने प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या आणि एक विशेष फेरी राबविली. तसेच कोट्यातील प्रवेश 43 हजार 723 असे मिळून आतापर्यंत 1 लाख 82 हजार 141 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यानंतरही तब्बल 1 लाख 7 हजार 36 जागा रिक्त राहिल्या आहेत. या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या फेरीला 1 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. 

या फेरीत पुरवणी परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना 4 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर 5 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दुसऱ्या विशेष फेरी दरम्यान विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी पसंतीनुसार महाविद्यालयात अर्ज करू शकणार आहेत. 5 जानेवारीला दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी प्रदर्शित करताना महाविद्यालयांना द्विलक्षी विषयासाठी आलेल्या अर्जानुसार निवड यादी तयार करून प्रसिद्ध करायची सूचना शिक्षण संचालनालयाने दिली आहे. 6 ते 8 जानेवारी दरम्यान दुसऱ्या विशेष दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

special merit list of FYJC admission will be declared on 5th january

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणार

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT