Chhagan Bhujbal family  sakal
मुंबई

Chhagan Bhujbal: भुजबळ कुटुंबावरील तो गुन्हा सत्र न्यायालयाने केला रद्द

बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा पूर्वलक्षीत प्रभावाने लागू केला जाऊ शकत नाही

, सकाळ वृत्तसेवा

बेनामी व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खटला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने अखेर निकाली काढला.

उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये सुधारणा केलेल्या बेनामी व्यवहार प्रतिबंध कायदा पूर्वलक्षीत प्रभावाने लागू केला जाऊ शकत नाही, असे म्हणत छगन भुजबळ, पंकज आणि समीर भुजबळ यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता.

मुंबईतील मालमत्ता आणि नाशिकमधील गिरणा साखर कारखान्यांसह तीन कंपन्यांच्या बेनामी संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ, पंकज आणि समीर भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नोव्हेंबर २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने भुजबळांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तसेच छगन, पंकज व समीर यांना समन्स बजावले.

गेल्यावर्षी भुजबळ कुटुंबीयांनी व कंपनीने या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले व कारवाई रद्द करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाचे न्या. आर. एन. लड्ढा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत गुन्हा रद्द केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी छगन भुजबळ, मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल केलेला खटला बंद करून निकाली काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT