Water Salute to Team India Plane 
मुंबई

Water Salute: टीम इंडियाच्या विमानाला 'वॉटर सॅल्युट'; मुंबई विमानतळावरील दृश्य पाहून व्हालं थक्क

T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर जगज्जेत्या भारतीय संघाचं आता मुंबईत आगमन झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर जगज्जेत्या भारतीय संघाचं आता मुंबईत आगमन झालं आहे. दिल्लीहून पंतप्रधानांची भेट घेऊन टीम इंडिला विस्तारा एअरलाईन्सनं खास विमानानं मुंबईत आणलं आहे. या विमानातच त्यांचं केक कापून सेलिब्रेशन केलं. विशेष म्हणजे मुंबई विमानतळावर या विमानाला विशेष असा वॉटर सॅल्युट देण्यात आला. याची दृश्येही समोर आली आहेत. ही दृश्ये पाहून तुम्हीही थक्क व्हालं. (Special water salute to T20 cricket winner team india plane scene at Mumbai airport is fabulous)

विमानातून खाली उतरण्यापूर्वीच विमानातच विस्तारा एअरलाईन्सच्यावतीनं केक कापून खेळाडूंचं स्वागत आणि सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यानंतर टीम थेट वानखेडे स्टेडियमकडं रवाना झाली. या ठिकाणी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत खेळाडूंची ओपन बसमधून रॅली निघणार आहे.

दरम्यान, मरिन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमध्ये टीम इंडियाच्या समर्थकांची तुफान गर्दी झाली आहे. माणसालाही चालता येणार नाही अशी गर्दी सध्या पहायाला मिळते आहे. पोलिसांनी अनेकांना आवाहन केलं आहे की त्यांनी मरिन ड्राईव्हच्या दिशेनं येऊ नये. तर दुसरीकडं केवळ पंधरा मिनिटांतच वानखेडे स्टेडियम फुल्ल झाल्यानं त्याचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

SCROLL FOR NEXT