Mumbai news 
मुंबई

Mumbai : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर स्पीड डिटेक्टर यंत्रणा! अपघात रोखण्यासाठी प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याच्या द्रुतगती महामार्गावर अती वेगाने वाहन पळवून गंभीर अपघाताच्या घटना घडत आहे. महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी १९८ अपघात झाले असून, ९२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.

यावर्षी सुद्धा जानेवारी ते मे या ५ महिन्यात ५७ अपघातामध्ये २७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर परिवहन विभागाच्या माहितीनुसार त्यांच्या सहा महिन्याच्या रस्ता सुरक्षा मोहिमेत सर्वाधिक केसेस फक्त ओव्हरस्पिडींगच्या करण्यात आल्या आहे. ज्यामध्ये तब्बल ११११० वाहनांवर ओव्हरस्पिडिंग ची कारवाई करण्यात आल्याने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आता परिवहन विभाग स्पीड डिटेक्टर यंत्रणा बसवणार आहे.

परिवहन विभागाने समृध्दी महामार्गावर ही यंत्रणा सुरू केली आहे. सध्या समृध्दी महामार्गावर अतिवेगाने गाडी चालवून नियोजित वेळेपूर्वी वाहन दुसऱ्या जागेवर पोहचत असल्यास वाहन टोल नाक्यावर जातांना सायरण वाजतो. त्यामुळे वाहन चालकाने अतिवेगाने वाहन पळवल्याचे ऑनलाईन लक्षात येताच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

शिवाय, समृध्दी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांचे टायर तपासणीचे काम सुद्धा सुरू आहे.अशाच पद्धतीने आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुद्धा स्पीड डिटेक्टर यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे रस्ता सुरक्षा कक्षाचे प्रमुख भरत कळसकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT