Mental health Esakal
मुंबई

Social Media : सोशल मीडियावर जास्त वेळ घालवण्याने झाला नागरिकांना मानसिक आरोग्यावर परिणाम

Spending more time on social media affects the mental health of citizens...

सकाळ डिजिटल टीम

मानसिक समस्या सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टेलिमानस हेल्पलाईन क्रमांक १४४१६ वर वर्षभरात ३० हजारांहून अधिक कॉल आले असून त्यांच्या ताणतणावावर समुपदेशनाच्या माध्यमातून मात करण्यात आली आहे. सर्वाधिक तक्रारी झोपेच्या त्रासाबाबत आहेत. सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे, कामाची चिंता, बेरोजगारी, परीक्षेचे दडपण, नातेसंबंधांतील कलह, आर्थिक चणचण आदींमुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्याशिवाय निरुत्साह किंवा तणावग्रस्त असल्याच्या तक्रारीही अनेकांनी समुपदेशकाकडे मांडल्या आहेत.

राज्य सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये टेलिमानस हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. नागरिकांना आपला तणाव आणि इतर मानसिक समस्यांबद्दल खुलेपणाने संवाद साधता यावा, समुपदेशन, योग्य निदान आणि उपचार मिळावेत यासाठी टेलिमानस हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. सरकारच्या मानसिक आरोग्य युनिटनुसार टेलिमानसच्या हेल्पलाईन क्रमांकावर एका वर्षात ३०,०३० कॉल आले. शासनाने ठाणे, पुणे आणि बीडमध्ये एकूण तीन केंद्रे सुरू केली आहेत. हेल्पलाईनवर उपस्थित समुपदेशक ललिता पंडागरे यांनी सांगितले, की निद्रानाशासंदर्भात अनेक फोन येतात.

आम्ही जेव्हा त्यांना त्यांच्या सवयींबद्दल विचारतो तेव्हा ते रात्री उशिरापर्यंत मोबाईलद्वारे सोशल मीडियावर आपला वेळ घालवताना दिसतात. शिवाय नोकरी, करिअर, नातेसंबंध, आर्थिक समस्या, परीक्षा इत्यादी काही चिंतांमुळे अनेकांना झोप येत नाही. सवयी आणि पौष्टिक आहार बदलण्यासाठी मार्गदर्शक योग व ध्यान करण्याची शिफारस त्यांना करण्यात येते.

हेल्पलाईनवर चिंता, नैराश्य, ब्रेकअप, आत्महत्या, आणीबाणी आणि गैरप्रकारासंबंधित विविध प्रकारचे कॉल येत असतात. सर्व कॉलना समुपदेशक उत्तरे देतात आणि नागरिकांच्या मानसिक समस्या सोडवल्या जातात. गरज भासल्यास त्यांना जवळच्या केंद्रात पाठवले जाते. आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार झोपेचा त्रास, त्यानंतर निरुत्साह, तणाव आणि अस्वस्थतेच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्याशिवाय इतर मानसिक त्रास, इतरांना मारणे, राग येणे इत्यादी तक्रारीही समोर आल्या आहेत.

८० टक्के समस्या सोडवणारे समुपदेशन

गेल्या काही वर्षांत विशेषत: कोरोनानंतर मानसिक आरोग्याबाबत जागरुकता वाढली आहे. त्याशिवाय ताणतणावही दिवसेंदिवस वाढत आहे. समुपदेशनातून ८० टक्के समस्या सोडवता येतात, असे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत आलेल्या तक्रारी गंभीर नव्हत्या. तथापि, कॉलवर समुपदेशन केल्यानंतर रुग्णाच्या स्थितीनुसार वैयक्तिक सेवा आवश्यक असल्यास त्याला प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवले जाते, असे मानसिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.

कोणी किती कॉल केले?

पुणे ः २००२

कोल्हापूर ः १९३५

सांगली ः १८७१

औरंगाबाद ः ९९८

मुंबई ः ९६१

ठाणे ः २६८

पालघर ः २४४

मुंबई उपनगर ः १६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT