संजय राऊत  File photo
मुंबई

'देशात युद्धासारखी स्थिती...' संजय राऊतांनी केली मोठी मागणी

'सर्वत्र संभ्रम आणि चिंता आहे'

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली, तर आरोग्य व्यवस्था कोलमडून पडू शकते. देशाच्या अनेक भागातून बेड्स, ऑक्सिजन, वेंटिलेटर्स अभावी रुग्ण नाहक प्राणांना मुकल्याच्या बातम्या येत आहेत.

महाराष्ट्रच नाही, तर देशभरातून ऑक्सिजनला मोठी मागणी आहे. कोरोनाची ही लाट थोपवण्यासाठी केलेल्या वेगवेगळया उपायोजना तोकडया पडत आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक टि्वट केले आहे.

"देशात एक अभूतपूर्व आणि युद्धासारखी स्थिती निर्माण झालीय. सर्वत्र संभ्रम आणि चिंता आहे. बेड्स, ऑक्सिजन आणि लसी सुद्धा उपलब्ध नाहीयत. फक्त सर्वत्र एकच गोंधळ आहे. या परिस्थितीत एकूणच कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे" अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती आहे?

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 45 हजार 654 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. चिंता वाढवणारी माहिती म्हणजे दिवसभरातील मृत्यांच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 503 रुग्णांना कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत राज्यात 60 हजार 473 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 31 लाख 06 हजार 828 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 70 हजार 388 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT