मुंबई

सॅनिटायझर फवारणीचा देशी जुगाड बंद! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चपराक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाविरोधी उपाययोजनांचा भाग म्हणून रेल्वेने सॅनिटायझर टनेल आणि एसटीने निर्जंतुकीकरण बस व निर्जंतुकीकरण कक्ष तयार केले आहेत. परंतु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सॅनिटायझर फवारणी आरोग्याला हानिकारक असल्याचे स्पष्ट केल्यावर हा "देशी जुगाड' बंद पडण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी जंतुनाशक (सॅनिटायझर) फवारणी यंत्रे बसवण्यात आली. रेल्वेने सॅनिटायझर टनेल आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण वाहन तयार केले. तथापि, अल्कोहोल, क्‍लोरीन व अन्य रसायनांच्या फवाऱ्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

कोरोनाबाधिताशी संपर्क, त्याच्या खोकण्यातून, शिंकेतून व त्याने हात लावलेल्या ठिकाणी हात लावण्यातून प्रादुर्भाव होतो. यावर उपाय म्हणून रेल्वेने सॅनिटायझर टनेल व एसटीने निर्जंतुकीकरण बस, कक्ष तयार करण्याचा सपाटा लावला होता. कोणतीही परवानगी न घेताच हा "देशी जुगाड' सुरू होता. आता आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर रेल्वे आणि एसटी प्रशासनाला अशा जंतुनाशक फवारणी यंत्रांचा वापर टाळावा लागणार आहे. 

हे दुष्परिणाम 
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर सॅनिटायझरची फवारणी केली जाते. त्यामुळे त्वचारोग, घसा खवखवणे असे दुष्परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. 

रेल्वे मंत्रालयाने सूचना केल्यावर सॅनिटायझर टनेल बंद करण्यात आला आहे. 
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

एसटी कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या निर्जंतुकीकरण बस कुठे वापरायच्या ते ठरले नव्हते. या बस बंदच आहेत. सॅनिटायझर फवारणीचे यंत्र कुठेही नाही. 
- शेखर चन्ने, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT