मुंबई

राज्य सरकारच्या आदेशाला ST प्रशासनाकडून केराची टोपली; गर्भवती आणि व्याधीग्रस्तांना कामातून सुट नाहीच

प्रशांत कांबळे



मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संसर्ग टाळण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय सेवेतील गर्भवती आणि व्याधीग्रस्त कर्मचाऱ्यांना कामावरून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधारावच एसटी महांडळाने सुद्धा या आदेशाची अमंलबजावणी करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहे. मात्र, आगार, डेपो स्तरावर या आदेशाची अंमलबजावणीच होत नसल्याने, नाईलाजास्तव गर्भवती, व्याधीग्रस्तांना कामावर यावे लागत असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्तता आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशा परिस्थित गर्भवती माता आणि व्याधीग्रस्तांना त्वरित संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामूळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनमध्ये गर्भवती आणि व्याधीग्रस्तांना सुट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर 7 ऑगष्ट रोजी एसटी महामंडळाने सुद्धा एसटीच्या विभाग नियंत्रकांना त्यासंबंधीत अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. यामध्ये गर्भवती आणि व्याधीग्रस्तांना फक्त डाॅक्टरांचे प्रमाणपत्र लागणार असून, इतर कोणत्याही नियम अटी नाही.   

मात्र, जिल्ह्यातील आगार, डेपो स्तरावर याची अमंलबजावणीच केली जात नसल्याचे दिसून येत आहे. डेपो मॅनेजर स्तरावर अद्याप आदेशच पोहचले नसून, त्याबद्दल माहिती नसल्याचे कारण दिल्या जात आहे. त्यामूळे गर्भवती आणि व्याधिग्रस्तांना नाईलाजास्तवर कामावर याव लागत आहे. 

परिपत्रकाचा हा मुद्दा ठरतोय मारक

ज्या क्षेत्रातील शासकीय कार्यालयामध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्यात आलेली आहे. अशा कार्यालयांमधील गर्भवती महिला तसेच व्याधीग्रस्त अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयामध्ये उपस्थिच राहण्यासाठी सुट देता येईल. मात्र, नियमित काम सुरू असलेल्या ठिकाणी ही सुट देता येणार नाही.

मेडीकल सर्टिफिकेट आणि निर्णयाची प्रत जोडून सुट मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, डेपो मॅनेजर यांनी अशा प्रकारची सुट मिळणार नाही. आठवड्यातून एक ते दोन दिवस तरी काम करावे लागेल असे सांगण्यात आले आहे. त्यामूळे अद्यापही कामावर जावे लागत आहे. 
- एसटीतील गर्भवती महिला कर्मचारी

पाचव्या क्रमांकाच्या मुद्याप्रमाणे राज्यातील संपुर्ण डेपो, आगारस्तरावर रोटेशन तात्काळ लावायला पाहिजे आणि परिपत्रकानुसार गर्भवती महिला आणि व्याधीग्रस्तांना कामामध्ये सुट दिली जावी. यासंदर्भात कुठे सुट दिल्या जात नसल्यास त्यांना स्वतंत्र सुचना दिल्या जाईल,
- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

SCROLL FOR NEXT