st bus  sakal media
मुंबई

एसटीच्या मुंबई विभागातच व्हिटीएस यंत्रणा कुचकामी; प्रवाशांच्या तक्रारी

प्रशिक्षण अभावी कर्मचारी व्हिटीएस हातळण्यात हतबल

प्रशांत कांबळे

मुंबई : प्रवाशांना बस स्थानकांवरील (bus stop) टिव्ही संचावर आणि मोबाईल अॅप मध्ये बसच्या (bus information on application) प्रवासासंदर्भातील अद्यावत माहिती देण्याचा दावा एसटी महामंडळाने (ST bus corporation) केला होता. मात्र, मुंबई विभागातच व्हिटीएस यंत्रणा (VTS technology) कुचकामी ठरत आहे. बसेसमध्ये व्हिटीएस प्रणालीवर चालवण्याचे प्रशिक्षण एसटी कर्मचाऱ्यांना (bus employee) नसल्याने अनेकवेळा बसेसची अद्यावत माहिती आॅनलाईन पद्धतीने (online) उपलब्ध होत नसल्याचे महामंडळाकडे प्रवाशांकडून तक्रारी करण्यात आल्या आहे.

व्हिटीएस प्रणालीमूळे एसटी प्रवाशांची बस स्थानकांवर जाऊन चौकशी करण्याची डोकेदुखी बंद होणार तर बस येण्याची, जाण्याची आणि सुटण्याच्या वेळेसह बसची सध्यास्थिती सुद्धा या व्हिटीएस प्रणालीमूळे प्रवाशांना बसल्या ठिकाणी पाहता येणार आहे. त्यासोबतच आजुबाजूला जवळचे एसटी बस स्थानक शोधण्यासाठी सुद्धा व्हिटीएस प्रणालीचे एॅप प्रवाशांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे एसटी महामंडळाने दावा केला होता.

महामंडळाच्या 30 विभागातील 250 आगारांमध्ये एकूण 16 हजार 505  बस मध्ये व्हिटीएस यंत्रणा बसविण्यात आले आहे. मात्र, मुंबईप्रमाणेच राज्यातील अनेक विभागात कर्मचाऱ्यांना या यंत्रणेचे प्रशिक्षणच नसल्याने यंत्रणेचे तिनतेरा वाजले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता फार जास्त नाही परिणामी अद्यावत यंत्रणेची फार माहिती नसते. नवनवीन यंत्रणेचे प्रशिक्षण दिले जात नसल्याने त्याचा वापर करण्यात अडचणी येते त्यामुळे वेळोवेळी अशा यंत्रणांचे प्रशिक्षण दिल्यास कर्मचाऱ्यांना योग्य काम करता येईल असे नाव न लिहिण्याच्या अटीवर एसटी कर्मचार्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT