ST-Bus
ST-Bus 
मुंबई

मद्यधुंद अवस्थेत एस.टी. चालवणाऱ्या चालकाची हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मद्यधुंद अवस्थेमध्ये एसटी बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मुजोर चालकाची एसटीच्या सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास आपल्या नोकरीला कायमचे मुकावे लागेल, अशी कडक नियमावली प्रशासनाने राबवावी, असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गुरुवारी (ता.25) पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर अमोल चोले या एसटी चालकाने मद्यपान करून बेकायदेशीर रित्या एसटीच्या शिवशाही बसचा ताबा घेऊन, बेदरकारपणे सदर बस चालवून अपघात घडवला. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पुणे विभाग नियंत्रकांनी सदर चालकाला एसटीच्या सेवेतून बडतर्फ केले.

प्रवासी हे दैवत समजून त्यांना सेवा देणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासामध्ये त्यांना सुरक्षित व सौजन्यशील सेवा देण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे, जेणेकरून एसटीवरचा प्रवाश्यांच्या अढळ विश्वासाला कोठेही तडा जाणार नाही. उपरोक्त प्रसंगासारख्या गैर कृत्यामुळे एसटीची प्रतिमा मलिन होणार नाही, याची काळजी एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रावते यांनी याप्रसंगी केले. तसेच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकावर कडक कारवाई करून, निर्भयपणे काम करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्याला धीर दिला.

त्याचप्रमाणे या कारवाईतून, बेशिस्त वर्तन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेजबाबदार एसटी कर्मचायांना देखील एसटीच्या सेवेतून बडतर्फ करून प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्दिष्टाला एसटीकडून कधीही गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतली जाणे अपेक्षित आहे, असे रावते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT