एमएसारटीसी बस
एमएसारटीसी बस 
मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : फक्त 2500 रुपये दिवाळी भेट मिळणार असल्यामुळे एसटी महामंडळातील कामगारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त कामगार संघटनेने शुक्रवारी (ता. 25) संपूर्ण राज्यात "निर्देश' आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांना सरकारच्या निर्णयानुसार थकबाकीसह तीन टक्के महागाई भत्ता, ऑक्‍टोबरचे वेतन व सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी द्यावे; तसेच 12 हजार 500 रुपये उचल द्यावी आदी मागण्यांसाठी 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात "निर्देश' आंदोलन करण्याची नोटीस कामगार संघटनांनी एसटी महामंडळाला दिली होती. त्यावर महामंडळाने 23 सप्टेंबरला पत्रक प्रसिद्ध करून कामगारांना मागील वर्षाप्रमाणेच यंदाही दिवाळी भेट म्हणून 2500 रुपये निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर देण्याचे आश्‍वासन दिले होते. 

वाढीव तीन टक्के महागाई भत्ता ऑक्‍टोबरच्या वेतनात देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने कामगारांच्या मागण्यांवर निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ 25 ऑक्‍टोबरला संपूर्ण राज्यात "निर्देश' आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT