bus sakal
मुंबई

बुधवार पासून एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर

सर्व संघटनांच्या कृती समितीने घेतला निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल ठोस कोणताही निर्णय न घेता, फक्त 5 टक्के महागाई भत्ता दिल्याने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटनामिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने दिवाळी गोड करण्याऐवजी कडू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रलंबित मागण्यांवर सरकार गंभीर होत नसून, शासनाच्या धोरणाच्या विरोधात एसटीतील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत . त्यानुसार राज्यभरातील डेपो,आगार पातळीवरील सर्व एसटी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात सहभागी होणार असून, या सर्व संघटनांचे पदाधिकारी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात उपोषणाला बसणार आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात केवळ 5 टक्के दिलेली वाढ अत्यल्प आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा भागू शकत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या व अत्यल्प पगार, कामगारांचा प्रचंड असंतोष याबाबींचा विचार करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर तसेच थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी द्यावी याबाबत शासनाने फेरविचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी संयुक्त कृती समितीकडून केली जात आहे.

राज्य शशनाप्रमाणे 1 एप्रिल 2016 पासून 28 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा शिवाय वार्षिक वेतनवाढीचा दर 3 टक्याप्रमाणे द्यावा, घरभाडे भत्ता 8,16,24 टक्के आणि थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपुर्वी देण्यात यावी.

- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT