ST Bus Employee
ST Bus Employee sakal media
मुंबई

एसटीची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही मुंबई उच्च न्यायालयात तोडगा निघाला नाही. राज्य सरकारचा विलीनीकरणाबद्दलचा अहवाल जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. त्यासाठी आता दोन आठवड्यांचा अवधी मंजूर करत खंडपीठाने सुनावणी ११ मार्चपर्यंत तहकूब केली.

सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सचिव स्तरावर समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांचा सीलबंद अहवाल गेल्या सुनावणीवेळी न्यायालयात सादर केला. हा अहवाल अद्यापही जाहीर करण्यात आला नाही.

संपकरी संघटनेने बदलले वकील

कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघंटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी २० डिसेंबर रोजी एसटी संपातून माघार घेतली. त्यानंतर दुखावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवत ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी या संपाचे नेतृत्व करून न्यायालयात बाजू मांडली आहे; मात्र आता सदावर्ते यांना बदलून संपकरी संघटनेने ॲड. योगेंद्र पेंडसे यांची नियुक्ती केल्याचे गुजर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT