ST
ST sakal
मुंबई

ST Mumbai : अर्ध्या तिकीटात एसटीचा प्रवास, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;१ महिन्यात तब्बल ४ कोटी, २२ लाख महिलांनी केला प्रवास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महिला सन्मान योजनेअंतर्गत अवघ्या महिन्याभरात तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केवळ महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत ६ लाखांची भर पडली असून सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापूर विभागात मिळाल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर विभागात 1 महिन्यात तब्बल ३० लाख २४ हजार महिलांनी प्रवास केला. सध्या दैनंदिन सरासरी १४ लाख पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असून, दैनंदिन सरासरी एकूण प्रवासी संख्या ५५ लाखाच्या घरात असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

अगदी पहिल्या दिवसापासून महिलांनी या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला असून स्वस्त सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवासाचा नवा पर्याय महिलांना एसटीच्या रूपाने प्राप्त झाला आहे.

विभाग - महिला प्रवासी संख्या

छत्रपती संभाजी नगर - ६३३७६२०

मुंबई - ७९७००४३

नागपूर - ५०७२७५८

पुणे - १०७२६०३४

नाशिक - ७६३७१८३

अमरावती - ४४४७६९६

एकूण - ४२१९१३३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT