मुंबई

मुंबईकरांच्या गर्दीपुढे एसटीच्या फेऱ्या कमीच; ठाणे, कल्याण, पनवेल मार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांच्या रांगा

प्रशांत कांबळे


मुंबई ः सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलसेवा बंद असल्याने मुंबईतील रस्ते विविध मार्गावर प्रवाशांची कोंडी होत आहे. उपनगरांतून मुंबईत कामावर येणाऱ्या प्रवाशांची सकाळी आणि सायंकाळी बसस्थानकांवर मोठी गर्दी होत आहे. मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी बेस्टने एक हजार एसटी बसगाड्या भाडेतत्वावर घेतल्या आहे. मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने एसटीच्या फेऱ्या कमी पडत असल्याचे चित्र मुंबईत ठिकठिकाणी दिसत आहे. 

सध्या केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलसेवा सुरू आहे. परिणामी खासगी आस्थापनांमधील कर्मचारी, व्यावसायिक तसेच कर्मचाऱ्यांना इतर प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील रस्त्यांवर वाहनांची आणि प्रवाशांची कोंडी होत आहे. उपनगरातून मुंबईत कामानिमित्ताने येणाऱ्यांकडे स्वतःचे खासगी वाहन किंवा एसटी हाच एकमेव पर्याय आहे. 
मात्र, मुंबईकरांच्या गर्दीपुढे एसटीच्या फेऱ्याच कमी पडत असल्याने प्रवाशांच्या बसस्थानकांसोबतच बसथांब्यावर रांगा लागत आहे. सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर तर ही गर्दी अधिकच होत असल्याने दादरवरून पनवेल, कल्याण, ठाणे मार्गावर बसगाड्याच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. 

टॅक्‍सीतून दाटीवाटीने प्रवास 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टॅक्‍सीत तीनच प्रवासी नेण्यास परवानगी असताना टॅक्‍सीतून दाटीवाटीने चार ते पाच जणांना बसवले जात आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

एसटी महामंडळाच्या सुरूवातीला कमी फेऱ्या होत्या. सध्या एसटीच्या दररोज सुमारे 800 एसटी फेऱ्या सुरू आहे. मात्र, प्रवाशांची गर्दी वाढत असल्यास त्याबाबत उपाययोजना केली जाणार आहे. सोमवारपासून कल्याण ते मंत्रालय मार्गावर चार शिवशाही फेऱ्या सुरू करण्यात आला आहे. 
- राहुल तोरो,
महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ  

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू; २९ मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

SCROLL FOR NEXT