anil parab esakal
मुंबई

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मे पर्यंत मुदतवाढ - ॲड. अनिल परब

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देत आहे.

मुंबई - कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आणि राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे (Strike) आगार तसेच विभागीय कार्यालयात स्मार्टकार्ड नोंदणीकरण (Smartcard Registration) व वितरण प्रक्रिया होऊ शकलेली नाही. त्यामुळे जेष्ठ नागरिक व इतर सवलत धारकांच्या स्मार्ट कार्ड योजनेला 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब (Dr Anil Parab) यांनी दिली. तर 1 जून पासून मात्र, राज्यात स्मार्ट कार्ड बंधनकारक राहिल असेही परब यांनी सांगितले आहे.

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देत आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची स्मार्ट कार्ड नोंदणी होऊ शकली नाही. त्यामूळे जेष्ठ नागरिकांना आता आगार स्तरावर 31 मे पर्यंत स्मार्टकार्डासाठी नोंदणी करता येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT