st bus sakal media
मुंबई

निवृत्तीनंतरच्या वेतनाच्या प्रतीक्षेतच ११ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू!

मुंबई, रायगड, पालघर विभागातील 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळातील (ST authorities) निवृत्त कर्मचाऱ्यांचा (retired employee) आपल्या निवृत्तिनंतरच्या वेतनाच्या प्रतिक्षेतच मृत्यू (death) होत असून, एसटी महामंडळाच्या नवनवीन परिपत्रकांमुळे झालेल्या गोंधळामुळे निवृत्ती वेतनामध्ये अडचणी निर्माण झाल्या असून त्यामुळे मुंबई (Mumbai), रायगड, पालघर विभागात आतापर्यंत 400 निवृत्त कर्मचारी निवृत्ती वेतनापासून वंचित असून, त्यापैकी 11 जणांचा निवृत्ती वेतनाच्या प्रतिक्षेतच मृत्यू झाला आहे. ( ST workers from Mumbai raigad palghar dyeing before getting retired salary amount-nss91)

एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर नियमानुसार ग्रॅज्युईटीची रक्कम, भविष्य निर्वाह निधी निवृत्ती दरम्यान जमा असलेल्या सुट्यांचे पैसे आणि करारातील एरिअर्सचा लाभ मिळतो. परंतु महामंडळाकडून निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटीची रक्कम, पी.एफ निवृत्तीनंतर काही महिन्याच्या आत मिळत असली तरी त्यांच्या हक्काचे शिल्लक सुट्ट्यांचे एरिअर्सची रक्कम आणि निवृत्ती वेतन गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याचा आरोप एसटीच्या कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे.

"एस. टी. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असून निवृत्त कर्मचाऱ्यांची अवहेलना सहन केली जाणार नाही."

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT