मुंबई

ST कर्मचाऱ्यांनी पुन्हा केली 'ही' मागणी, कारण सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे भीतीचं वातावरण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामूळे एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, पालघर, ठाणे येथून एसटीची सेवा सुरू आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता एसटीचे अधिकारी, कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा देत आहेत. तर राज्यात आंतरराज्य एसटी सेवा सुरू झाली आहे. यादरम्यान एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची भिती निर्माण झाली आहे. 

एसटीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. स्थानिक प्रशासनाकडून त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. एसटीच्या कुर्ला नेहरू आगारात सुमारे सुमारे 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाला असल्याचा दावा एसटी कामगार संघंटनेने केला आहे.  

तर, काही कर्मचाऱ्यांना सर्दी, ताप,  खोकला, अंगदुखी सारखा त्रास सुरू झालेला आहे. यामुळे  इतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याचा थेट परिणाम कामगिरीवर आणि  कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर ही होणार आहे.  कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न केल्यास कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.

ST workers in mumbai demands for covid testing as many ST workers are detected positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT