मुंबई

मे 2020 पासून वेतन नाही, एशियाटिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची फरफट

मिलिंद तांबे

मुंबई, ता.24 : ऐतिहासिक वारसा असलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या ग्रंथालयाचे कर्मचारी सध्या प्रचंड हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊनचे कारण सांगून त्यांना अर्ध्यापेक्षा कमी  वेतन दिले जात आहे. त्यात रेल्वे प्रवासाची परवानगी नाही, पी. एफ. आणि इतर कपात यामुळे जगायचे तरी कसे असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

देशातील मोठ्या आणि ऐतिहासिक वास्तूंपैकी एशियाटिक ग्रंथालय आहे. येथे मोठमोठे विद्वान आणि उच्चपदस्थ मंडळी येतात. अशा ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधकारमय  झालंय. कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता बुद्धीजीवींनी पुढाकार घ्यावा असे या कर्मचाऱ्यांना वाटते. अन्यथा आम्हाला जीव देण्याशिवाय पर्याय नाही अशी उद्विग्नता इथल्या कर्मचा-यांनी व्यक्त केली. 

वर्षानीवर्षं हे कर्मचारी इथे काम करत आहेत.  वयाच्या 50 शी नंतर कुटुंबातील स्थिती, शिक्षण घेणाऱ्यांसाठी कुटुंबात होणारा खर्च अशा आयुष्याच्या नाजूक वळणावर वावरत कशीबशी नोकरी सांभाळत असताना आज हे सहन करावे लागत आहे, त्यामुळे कर्मचारी रडकुंडीला आले आहेत. त्यांना कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे.  

इथल्या 30 कर्मचाऱ्यांना मे 2020 पासून वेतन दिले गेले नाही. ऑगस्ट 2020 पासूनचा प्रवासभत्ता दिला गेला नाही. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. याबाबत त्यांनी सर्व संबंधितांना पत्रव्यवहार करून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे या कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे अपेक्षित असतानाही तसे वेतन तर मिळत नाही परंतु जे काही वेतन निश्चित केले आहे, त्यातदेखील मोठ्या प्रमाणावर कपात होत आहे. पैशाअभावी वेतन दिले जात नसल्याचा दावा व्यवस्थापनाचा असला तरी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

व्यवस्थापन समितीत महाराष्ट्र शासनाचे तसेच केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा देखील प्रतिनिधी असतो. त्यामुळे हा प्रश्न सहजरित्या सुटू शकतो. तरीही व्यवस्थापनाची उदासीन भूमिका या सर्व प्रकाराला कारणीभूत आहे. त्यात हे 30 कर्मचारी भरडले जात आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाचे निमित्त सांगण्यात येत असले तरी निश्चित वेतन नंतरच्या काळातदेखील मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. कर्मचा-यांना त्यामुळे त्यांचे मासिक खर्च भागविणे अशक्य झाले आहे.

The staff of the Asiatic Society of Mumbai library with a rich historical heritage currently in a state of panic

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

SCROLL FOR NEXT