मुंबई

ब्रेकिंग : शरद पवार यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव...

सुमित बागुल

मुंबई : मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झालाय. शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक'मध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. सिल्व्हर ओक मधील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झालीये. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्या दोन्ही सुरक्षा रक्षकांच्या थेट संपर्कात आलेले नव्हते अशी माहिती मिळतेय. 

शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक'वरील एकूण सहा जणांची सर्वात आधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झालीये. यानंतर आता सिल्व्हर ओक वरील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेलीये. मिळालेल्या माहितीनुसार सिल्व्हर ओक वरील काही जणांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. यामध्ये शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांचा देखील समावेश आहे. त्यानंतर त्यांची रॅपिड टेस्ट केल्याचं समजतंय. त्यातल्या दोघांना कोरोनाची लागण झालीये.   

शरद पवारांची होणार कोरोना टेस्ट ?

शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील सर्व स्टाफच्या कोरोना टेस्ट केल्या गेल्यात. मात्र स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा कुटुंबातील कुणीही कोरोना टेस्ट केल्याचं अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. मात्र शरद पवारांच्या सर्व स्टाफच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत. आता कर्मचाऱ्यांना आपल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दरम्यान सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे.  

मातोश्रीवरही  कोरोना : 

याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या मातोश्री निवास्थानबाहेरील पोलिसांना त्याचसोबत रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या अंगरक्षकांना देखील कोरोना झाल्याची घटना घडली आहे. 

staff from sharad pawars silver oak residence detected covid 19 positive  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT