मुंबई

आम्हाला एप्रिल महिन्यापासून पगार मिळालेला नाही, विशेष शाळेतल्या कर्मचाऱ्यांची व्यथा

पूजा विचारे

मुंबईः मुंबईतल्या काही विशेष शाळांमधील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यांपासूनच पगारच मिळालेला नाही आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून अनुदान वाटपात विलंब झाल्यामुळे एप्रिल महिन्यापासून शाळेतल्या कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. अनुदान वितरणासंदर्भात विभागाला अनेक विनंत्या केल्या असल्याचं एका शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. 

सद्यस्थितीत शहरात आणि विशेष मुलांसाठी उपनगरामध्ये एकूण ५२ शाळा आहेत. या शाळा कर्मचारी वर्ग सदस्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्याअनुदानातून पगार देतात. मात्र लॉकडाऊनमुळे अनुदान लांबणीवर पडल्यानं बर्‍याच शिक्षकांना आता जवळपास चार महिन्यांपासून पगारच होत नाही.

आम्ही सामाजिक न्याय विभागांतर्गत आलो आहोत आणि आम्हाला मिळालेली आर्थिक मदत ही अनुदान मदत म्हणून मानली जाते. लॉकडाऊनमुळे अधिकाऱ्यांना पगारासाठी लागणारी कागदपत्रे पूर्ण करता आली नाहीत, यामुळे विलंब झाला आहे. पण ही आमची रोजीरोटी आहे. ही वेळ आली आहे की विभाग आमच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देईल, असं दक्षिण मुंबईतील शाळेतील एक शिक्षक यांनी म्हटलं आहे. 

शहरातील विशेष शाळांना एप्रिलमध्ये अखेरचं अनुदान मिळालं होतं, मात्र उपनगरामध्ये कर्मचाऱ्यांना मार्चनंतर अनुदान मिळालेले नाही. या शाळांमध्ये शिक्षक आणि शाळेतील अन्य कर्मचाऱ्यांसह एकूण एक हजार कर्मचारी आहेत.

आता हा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांनी शिक्षक संघटनेच्या शिक्षकांमार्फत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही. असं असूनही, आम्ही ऑनलाइन शिकवणं, फोनवरुन सल्ला देणं इत्यादी गोष्टींसह घरातून मुलांना शिकवणी सुरु ठेवली आहे.  या मुलांना आपल्याकडून विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे आणि म्हणूनच, आठवड्यातून एकदा तरी त्यांच्याशी संपर्कात रहाणे आम्हाला आवश्यक आहे. मात्र हीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही आमचं काम चालू ठेवू शकणार नसल्याचं आणखी एका शिक्षकानं म्हटलं आहे. 

सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या विभागात यापूर्वी अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. एक तांत्रिक अडचण आहे आणि मंत्रालयाच्या मदतीने आम्ही लवकरात लवकर त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करु.

शिक्षकांच्या पगाराच्या दिरंगाईसंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाला पत्र लिहणारे एमएलसी कपिल पाटील म्हणाले की, ही पूर्णपणे विभागाची चूक आहे. कोरोना व्हायरसमुळे ही अभूतपूर्व परिस्थिती आहे हे आम्हाला समजले आहे, मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यावर त्याचा परिणाम होऊ नये. हे केवळ शिक्षकांच्या संकटामध्ये भर घालेल. या विषयाबाबत पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेही संपर्क साधला आहे.

staffers at special schools they haven't received salaries since April

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT