मुंबई

मुंबईच्या अर्थसंकल्पांच्या फेरफारीला आयुक्तांची कात्री; 250 कोटींचा निधी कापला

समीर सुर्वे

मुंबई : अर्थसंकल्पात होणाऱ्या फेरफारीला आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 250 कोटी रुपयांची कात्री लावली आहे. स्थायी समितीला अर्थसंकल्पात फेरफारकरुन 900 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 650 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.या 650 कोटी रुपयांच्या फेरफारीसह आज स्थायी समितीत 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे.

महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समितीत 3 फेब्रुवारी रोजी 39 हजार 38 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. या अर्थसंकल्पाला आज स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे स्थायी समितीने अर्थसंकल्पात फेरफार करुन 1 हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. तर, आयुक्तांनी 900 कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यानंतर निधीवाटपा बाबत झालेल्या चुकीच्या आरोपांमुळे हा निधी आयुक्तांनी कमी करुन 650 कोटी रुपयांवर आणला, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. तर, गेल्या वर्षी स्थायी समितीत फेरफार करुन 700 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.

स्थायी समितीत फेरफार करुन प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो. तर, त्याचबरोबर नगरसेवकांनी तसेच राजकीय पक्षांनी सुचवलेल्या कामांसाठी निधी दिला जातो. निवडणुकीच्या वर्षात प्रत्येक वेळेला जास्तीच्या निधी नगरसेवकांकडून केली जाते. मात्र, यंदा निधी कमी झाला आहे.

नगरसेवक निधीला कात्री

फेरफार करुन अर्थसंकल्पाला एकमताने मंजूरी मिळाली आहे. अद्याप फेरफार केलेला निधी कोठे वापराचा हे ठरलेले नाही. तसेच,नगरसेवकांना विकास निधी दिला जाणारा 1 कोटी रुपयांच्या निधीबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.असेही जाधव यांनी सांगितले.

नक्की काय झाले

यशवंत जाधव यांनी त्यांच्या प्रभागासाठी जास्त निधी घेतल्याचा आक्षेप भाजपचे नगरसेवक विनाेद मिश्रा यांनी घेतला होता.त्यामुळे जाधव आणि मिश्रा यांच्यात वाद निर्माण झाला होता.या वादामुळे हा निधी कापला गेला असल्याचा दावा केला जात आहे. 

standing committee gets funds of 650 crore after orders of iqbal singh chahals order

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT