SBI Bank esakal
मुंबई

SBI चं नमतं; गर्भवतींना कामास असक्षम ठरवणारा नियम अखेर रद्द!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेला (Pregnant woman) काम करण्यापासून रोखणारी आणि तिला कामासाठी सक्षम नसल्याचे जाहीर करणारी नवी नियमावली (New rules) स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नुकतीच जाहीर केली होती. मात्र, महिलांसह सर्वच स्तरांतून झालेल्या बऱ्याच विरोधानंतर एसबीआयला हा आदेश मागे घ्यावा लागला आहे.

एसबीआयने डिसेंबरमध्ये जाहीर केलेल्या नियमांनुसार तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेला नियुक्तीबाबत असक्षम ठरवले होते. बँकेने म्हटले होते की, अशा महिला प्रसूतीच्या चार महिन्यांनंतर कामावर रुजू होऊ शकतील. बँकेच्या या नियमावलीविरोधात कामगार संघटना, महिला आयोग व सर्वच स्तरावरून कठोर शब्दांत टीका केली जात होती. सर्व स्तरावरून होणाऱ्या टीकेनंतर एसबीआयने शनिवारी हा वादग्रस्त आदेश थंडबस्त्यात गुंडाळला आहे. एसबीआयने स्पष्ट केले की, सर्वांच्या भावना लक्षात घेता आम्ही गर्भवती महिलांच्या नियुक्तीबाबतची नियमावली मागे घेत आहोत आणि यापुढे जुने नियमच कायम राहतील.

बँक कर्मचाऱ्यांमध्ये २५ टक्के महिला

एसबीआयने पुढे सांगितले की, ते आपल्या महिला कर्मचाऱ्यांच्या देखभालीसाठी आणि त्यांच्या सशक्तिकरणासाठी कायम सक्रिय राहिले आहेत. बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के झालेली आहे. बँकेने कोविडकाळ सुरू झाल्यापासून सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगीही दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT