varsha-gaikwad.jpg 
मुंबई

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा

दीनानाथ परब

दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाची वर्ष आहेत. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावी परीक्षेच्या तयारीवर परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे बरेच महिने विद्यार्थी घरीच होते. या काळात शाळा-कॉलेजेस ऑनलाइन सुरु होती. यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारे निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या आज दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.  

मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांची परिस्थिती लक्षात घेता राज्यभरातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय आज जाहीर केला. यामुळे राज्यातील तब्बल 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

- दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार.
-  दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे या कालावधीत 
- बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार
- विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा देता येणार. 
- विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान कोरोनाची लागण झाल्यास जूनमध्ये विशेष परीक्षा होणार. 
- दहावी-बारीवीची प्रॅक्टीकल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर होईल. 
- विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव नसल्याने ३० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येईल. 
- दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी पेपरसाठी ६० मिनिट एक तास अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

IND vs WI ODI Squad: यशस्वी, ऋतुराज IN; श्रेयस, इशान, बुमराहसह ७ खेळाडू OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ... असं का होणार?

Live Updates Marathi : स्वरूप नगर भागात बांधकामाधीन असलेले एक घर कोसळले

Chhatrapati Sambhajinagar News: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिमेंट रस्ता अचानक खचला; बिडकीनमध्ये खळबळ

Baramati News: माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्लेसमेंटमध्ये दमदार कामगिरी; २३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

SCROLL FOR NEXT