Teacher sakal media
मुंबई

शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे, उशीरा सुरु केली बस वाहतूक व्यवस्था

संजीव भागवत

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने (Education School section) दहावीच्या निकालासंदर्भात (SSC Result) दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा आणि शिक्षकांकडून सर्व कामकाज आटोपलेले असताना शालेय शिक्षण विभागाने मुंबई बाहेर राहणाऱ्या शिक्षकांना (Teacher Outside Mumbai) मुंबईत आपल्या शाळांवर पोहोचण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ( State Transport Board) बसच्या प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे, शिक्षण विभागाच्या या उशिरा घेण्यात आलेल्या निर्णयावर शिक्षक संघटनांनी (Teachers Union) जोरदार टीका केली आहे. ( State education ministry Announces bus traveling facility late for teachers work)

दहावीच्या निकालासंदर्भात राज्यात 11 जूनपासून शाळा स्तरावर निकालपत्र तयार करण्याच्या कामकाजाला सुरुवात झाली होती. तर 30जूनपर्यंत हे निकाल तयार करून विभागीय मंडळांना सादर करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली होती. त्यात मुंबईत काही शाळांचे निकालपत्राचे कामकाज शिल्लक राहिले होते, ते मागील दोन दिवसात उरकण्यात आले असल्याचे शाळांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

शिक्षण विभागाने दिलेल्या या वेळापत्रकानुसार मुंबईसह राज्यातील सर्व शाळांकडून दहावीचा निकालपत्राचे कामकाज काही अपवाद वगळता पूर्ण झालेले असताना मुंबई शिक्षण उपसंचालक यांनी ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात राहणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक यांना मुंबईत येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसची सोय केली असल्याचे परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये विरार, नालासोपारा, अर्नाळा, वसई, तसेच बदलापूर आदी ठिकाणांहून या बसेस सुरू करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण संचालकांकडून जारी करण्यात आली आहे.

मुंबई बाहेर राहणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना दहावीच्या निकालाच्या कामकाजासाठी लोकल सेवेच्या प्रवासाची मुभा मिळावी म्हणून आम्ही अनेक वेळा सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु अर्ध्याहून अधिक शिक्षकांना तो प्रवास मिळालाच नाही त्यामुळे त्यावर पांघरूण घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता आमच्यासाठी बस सुरू केले असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला.

सगळे कामकाज उरकल्यावर बस प्रवासासाठी परिपत्रक काढून शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे प्रकार केला आहे. आम्ही विविध संकटांना सामोरे जाऊन दहावीचा निकाल पत्राचे कामकाज पूर्ण केले आहे. तरीही या बस प्रवासाचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा इतका उशीर का लागला लावण्यात आला असा सवाल शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : 3 गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तीन जणांना अटक

SCROLL FOR NEXT