मुंबई

राज्य सरकारकडून फेरीवाल्यांना मनाई कायम; व्यवसाय करण्यास परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट

- सुनीता महामुणकर

मुंबई : चार महिन्यांपासून व्यवसाय बंद झालेल्या फेरीवाल्यांना राज्य सरकारकडून अद्यापही दिलासा मिळालेला नाही. व्यवसाय करण्यास परवानगी मिळणार नाही, असे आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे तूर्तास तरी त्यांना व्यवसाय करण्यास मनाई कायम असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.

महापालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा आधीच कोव्हिड 19 मुळे अतिरिक्त काम करीत आहे. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांनी सुरक्षित तत्त्वांचे पालन करण्यासाठी यंत्रणा राबवणे शक्य होणार नाही, असे राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते मनोज ओस्वाल यांनी केलेल्या जनहित याचिकेमध्ये फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे. 

फेरीवाल्यांवर नियंत्रण अशक्य
मुंबई पालिकेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र केले आहे. फेरीवाले असंघटित क्षेत्रात येत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही, असे सरकार म्हणते. कंटेन्मेंट झोन नसलेल्या भागांमध्येही अशी परवानगी देता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

-------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT