मुंबई

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्यातर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका - राज्य सरकार

सुनिता महामुनकर

मुंबई : विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा विरोध दर्शविला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतला, असेही प्रतिज्ञापत्राद्वारे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने न्यायालयात बुधवारी प्रतिज्ञापत्र करण्यात आले आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून नुकताच याबाबत बैठक घेण्यात आली होती. कोरोनाचा धोका वाढत आहे आणि अनेक महापालिकानी लौकडाऊन जाहीर केला आहे. तसेच काही शाळा महाविद्यालय क्वारंटाईन सेंटर आणि विलगीकरण कक्ष म्हणून वापरण्यात येत आहे. राज्यभरात ही परिस्थिती आहे. त्यामुळे सुरक्षेचा विचार करून कायदेशीररित्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला, असे समर्थन सरकारकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा विळखा वाढत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना मागील प्रगतीनुसार गुण देण्याचा प्रस्तावही सरकारने जाहीर केला आहे. राज्य सरकारने याबाबत ता 19 जून रोजी परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे पुण्यातील निव्रुत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एड उदय वारूंजीकर यांनी विरोध केला आहे. यूजीसीलाही न्यायालयाने खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार आहेत, राज्य सरकारला परीक्षा आणि मूल्यांकनबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा दावा  जनहित याचिकेत करण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेली अभ्यासक्रम वर्गवारीही अवैध आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. मात्र राज्य सरकारने हा निर्णय कायदेशीर पद्धतीने घेतल्याचा दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT