State government Magnetic Maharashtra third phase delayed pm narendra modi did not get time
State government Magnetic Maharashtra third phase delayed pm narendra modi did not get time Sakal
मुंबई

Magnetic Maharashtra : राज्य सरकारच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ला विलंब?

सकाळ वृत्तसेवा

- पांडुरंग म्हस्के

मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या तिसऱ्या टप्प्यात रोजगाराच्या ३ लाख ३० हजार संधी उपलब्ध होणार असल्या, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने यंदाच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये अपेक्षित असलेला हा कार्यक्रम आणखी लांबण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार देशांतर्गत आणि विदेशी कंपन्यांपैकी ९० टक्के कंपन्यांना जागा वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात तब्बल १ लाख ८९ हजार ५०८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

मात्र, या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून अद्यापही कोणत्याच हालचाली सुरु नसल्याचे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्य सरकारला हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करायचा आहे, मात्र पंतप्रधान सध्या विविध राज्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात व्यस्त होण्याची शक्यता असल्याने, त्यांच्या कार्यालयाकडून नोहेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा वेळ उपलब्ध नाही. पर्यायाने मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा तिसरा टप्पा लांबणार आहे.

राज्य सरकारतर्फे उद्योगधंदे, रोजगार व गुंतवणुकीस चालना देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यानुसार ९८ स्थानिक आणि विदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.

त्यात कृषी, मालवाहतूक, माहिती तंत्रज्ञान, रासायनिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांपैकी जवळपास ९० टक्के कंपन्यांना राज्य सरकारकडून जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

यातील काही कंपन्यांना खासगी मालकीच्या ठिकाणीही जमीन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास दोन कंपन्यांसाठी अद्याप जागांचा शोध सुरू असून, या दोन कंपन्या ठाणे येथे गुंतवणूक करणार आहेत. तर पाच कंपन्यांना जागा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांच्या खासगी सचिवाला याबाबत माहिती देऊनही त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अशी असेल गुंतवणूक

जेएसडब्ल्यू नेल या कंपनीकडून कोल्हापूर, धाराशीव, सातारा आणि सोलापूर येथे सर्वाधिक ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भिवंडी येथे इंडियन कार्पोरेशन लॉजिस्टिक कंपनी ११ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून ७५ हजार रोजगार निर्माण होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

Jonty Rhodes : गंभीर 2019 पासूनची परंपरा मोडणार; जॉन्टी रोड्स होणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

Rajeev Karandikar Debate : ईव्हीएम प्रकरण न्यायालयात; मशीन हॅक करता येते की नाही या प्रश्नावर राजीव करंदीकर काय म्हणाले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT