मुंबई

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याला राज्य सरकारचा विरोध

- सुनीता महामुणकर

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याला राज्य सरकारने सोमवारी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला. व्यक्तिगत भावना दुखावल्या म्हणून अकाऊंट बंद करा अशी याचिका दाखल होऊ शकत नाही, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला.

वकील अली काशीफ खान देशमुख यांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद करावे या मागणीसाठी न्यायालयात याचिका केली आहे. मात्र व्यक्तीगत कारणासाठी अशी मागणी करणे अप्रस्तुत आहे, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला. तसेच याचिकादाराने जनहित याचिका केली तर यावर खुलासा करु असेही सरकारकडून सांगण्यात आले. 

ज्याप्रमाणे याचिकादाराचे मूलभूत अधिकार आहेत. त्याप्रमाणे अन्य व्यक्तींनाही विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याचिकेवर पुन्हा विचार करा असे मत खंडपीठाने व्यक्त केले. याचिकेवर पुढील सुनावणी 7 जानेवारीला आहे. कंगना ट्विटद्वारे धार्मिक द्वेष निर्माण करीत आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

State government oppose close Kangana Ranaut Twitter account bombay high court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT