मुंबई

राज्य सरकारने दिव्यांगाना दरमहा 5000 रूपयांची मदत द्यावी;  निर्धार विकलांग विकास सामाजीक संघाची मागणी

प्रशांत कांबळे


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन असल्याने रेल्वेची सेवा बंद झाली आहे. रेल्वेवर अवलंबून असलेल्या दिव्यांगाची आता उपासमारीची वेळ आली आहे. दिव्यागांचे व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटामूळे घराचे भाडे, विजबिल व त्यांच्या कुटूंबांच्या दैनंदिन गरजा, आरोग्य, मुलांच्या शाळेच्या फी थकली आहे. त्यामूळे राज्य सरकारने पाच हजार रुपयांची आर्थीक मदत करावी अशी मागणी  निर्धार विकलांग विकास सामाजीक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई उपनगरातील रेल्वे सेवा बंद आहे. त्यामूळे रेल्वे आणि स्टेशन मार्गांवर काम करणाऱ्या आणि लोकलमधून विविध साहित्य विक्री करणाऱ्या दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. ताळेबंदीच्या काळात दिव्यांगांना राज्य शासनाकडुन आतापर्यंत कसलीही मदत मिळाली नसून दिव्यांगांना तातडीने आर्थिक गरज असल्याचे दिव्यांगासाठी काम  करणाऱ्या निर्धार विकलांग विकास सामाजीक संघाने सांगितले आहे. 

दिव्यांग बांधव टाळेबंदीचे पालन करीत घरात बसून आहे. त्यांचा रोजगार बंद पडला असल्याने, दुसरा कोणताही उपजिविकेचे साधन नाही. त्यामुळे दिव्यांग हवालदिल झाले आहे. गेल्या पाच महिन्यापासून अद्याप लाॅकडाऊन काळ सुरूच असल्याने, दिव्यांगांना जगने मुश्किल झाले आहे. त्यात सरकारकडून कसलीही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे दिव्यांगांचे कुटूंब उपासमारीकडे वाटचाल करीत आहे. 

मी स्वतः 74 टक्के दिव्यांग असून घाटकोपर येथे भाड्याच्या घरात रहात असून गेले 5 महिने आर्थीक संकटात आहे. राज्य शासनाकडुन कसलीही मदत मिळालेली नाही. त्यातच 5 महिन्याचे घरभाडे व विज बिल भरायचे बाकी आहे. तर असे अनेक दिव्यांग बांधव उपासमारीने बेजार झालेले आहेत. अपंगांना जर मदत मिळाली नाही तर कदाचित अपंग देखील शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करण्यासारखे पाऊल उचलतील 
- नितीन गायकवाड, दिव्यांग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT