मुंबई

खबरदार संपावर गेलात तर...! राज्य सरकारचा शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना इशारा

तुषार सोनवणे

मुंबई - राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी ( आज ) संप पुकरण्याचा इशारा दिला होती. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी लाक्षणिक संपाची नोटीस शासनास दिली आहे. परंतु या संपाला राज्य सरकारने तीव्र इशारा दिला आहे. संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा आदेशच सरकारने प्रसिद्ध केला आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि कृषी धोरणांच्या विरोधात कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकरला आहे. त्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाही सहभागी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर जाऊ शकतात. कोव्हिड संसर्ग काळात अशा प्रकारचे संप केल्याने नागरिकांच्या कामाची कोंडी होऊ शकते. या संपामध्ये सहभागी होणाऱ्या संघटना या बहुतांष कॉंग्रेस आणि डाव्या पक्षाशी संबधीत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) 1979 मधील नियम 6 च्या तरतूदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र सरकारप्रमाणेच 'काम नाही वेतन नाही', असे धोरण राज्य सरकारही अनुसरत आहे. शिस्तभंगाची कारवाई हा कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विधायक मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात, जनतेची गैरसोय करू नये. असेही राज्यसरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT