temple 
मुंबई

धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत संकेत, मंत्री अस्लम शेख म्हणाले...

निसार अली

मालाड : मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरु करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असून  लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत ना. शेख यांच्या दालनात  सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर  अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला मिनारा मशिदीचे विश्वस्त मोहद असिफ मेमन, अब्दुल वहाब लतिफ, जामा मशिदीचे चेअरमन शोहेब खातिब, जामा मशिदीचे विश्वस्त नाजिर तुंगेकर, साबिर निरमन आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलाॅकच्या प्रक्रियेअंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली. अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

(संपादन : वैभव गाटे)

reopening of temples in maharashtra within some days ministry aslam shaikh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT