मुंबई

मनोरा आमदार निवासाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे; फडणवीसांना ठाकरे सरकारचा पुन्हा दणका

तुषार सोनवणे

मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. सत्तेत आल्यावर ठाकरे सरकारने फडणवीस यांच्या काळातील अनेक महत्वाचे निर्णय स्थगित केले. फढणवीस सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा अद्यापही ठाकरे सरकारने कायम ठेवला आहे. मुंबईतील मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुवर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अखात्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एनबीसीसीला फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुरर्बांधनीचे काम काम देण्यात आले होते. हा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केल्याची माहिती मिळत आहे. हे काम आता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.

विधीमंडळाच्या उत्ताधिकार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. तसंच, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एन.बी.सी.सी. यांच्याऐवजी पुढील काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यास तसेच या कामाच्या खर्चास तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी देण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT