मुंबई

राज्य सरकारची करमाफी योजना अन्यायकारक! राज्यातील वाहतूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप 

प्रशांत कांबळे

मुंबई : राज्य सरकारने नुकताच राज्यातील माल व प्रवासी वाहतूकदारांना सहा महिन्यांसाठी 700 कोटी रुपयांची कर माफी दिली आहे. मात्र, या करमाफीचा लाभ नियमित कर भरणाऱ्या वाहतूकदारांना मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी वाहतूकदार संघटनांनी केली असतांनाही, गेल्या दोन महिन्यांपासून त्याची दखल घेण्यात आली नसल्याने, राज्यातील वाहतूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक संघंटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केला आहे. 

कोरोनाच्या काळात प्रवासी, माल वाहतूकदारांची वाहने उभीच असल्याने या व्यवसायावर आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यामुळे बॅंकेचे हफ्ते, कर, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुद्धा वाहतूकदारांकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीतही सोने-चांदी गहाण ठेवून वाहतूकदारांनी बॅंकेचे हफ्ते फेडले. तर वाहनांचा कर सुद्धा भरला आहे. दरम्यान कोरोना काळातील कर माफ करण्याची मागणी वाहतूकदार संघटनांनी केली होती. मात्र, यामध्ये राज्य सरकारने 1 फेब्रुवारी ते 31 जानेवारी असा एक वर्षांचा कर भरणा करणाऱ्यांना मात्र या करमाफी योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे करमाफी योजना वाहतूकदारांवर अन्याय करणार असून, राज्य सरकारने सर्वच वाहतूकदारांना या कर माफीचा लाभ देण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या आदेशामध्ये बदल करण्याची मागणी बाबा शिंदे यांनी केली आहे. 

करमाफीची अंमलबजावणी प्रलंबित 
राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वीच वाहतूकदारांच्या कर माफीची घोषणा केली. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणीच केली नाही. राज्य परिवहन विभागाचे (आरटीओ) संपूर्ण काम ऑनलाईन पद्धतीने चालत असल्याचे सांगितले जाते. मात्र, राज्य सरकारने अद्याप वाहतूकदारांच्या ऑनलाईन खात्यामध्ये करमाफीची रक्कम जमा केली नसल्याने, सरकारच्या करमाफी योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT