Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray e sakal
मुंबई

मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसला - देवेंद्र फडणवीस

"मुंबईत विशेषत: काही वॉडर्सची तोडफोड करुन, आपल्याला पाहिजे तसा वॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे"

दीनानाथ परब

मुंबई: आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत (ministers meeting) मुंबई महापालिका निवडणुकीच्या (bmc election) पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना, प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं मत जाणून घेण्यात आलं. "मंत्रिमंडळ बैठकीत काय प्रस्ताव आहे, याची मला कल्पना नाही. वॉर्ड रचना, प्रभाग रचना किंवा कुठलीही रचना केली, तरी मुंबई किंवा अन्य महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळणार" असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

"मुंबईत विशेषत: काही वॉडर्सची तोडफोड करुन, आपल्याला पाहिजे तसा वॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. पण आम्ही सजग आहोत. निवडणुक आयोगाला कल्पना दिलीय. निवडणूक आयोगाने कृती केली नाही तर कोर्टात जाऊ" असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महिला अत्याचारासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांनी पत्र लिहिलं आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे उत्तर दिलं, या संदर्भात फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, "मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा त्या पत्रातून पाहायला मिळतो. मी मुख्यमंत्री होतो. विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यपालांची भेट घेतं. त्या मागण्यांवर राज्यपाल आपले पत्र जोडतात. याचा अर्थ निर्देश दिले असा होत नाही. ही पद्धत आजपासूनची नाही. गेली २५-३० वर्ष मी राजकारणात हे बघतोय"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT