मुंबई

मध्य रेल्वेचे वराती मागून घोडे, लोकलमध्ये 'कृपया इथे बसू नये' वाक्यांचे स्टिकर

प्रशांत कांबळे

मुंबई:  लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 15 जूनपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर लोकल सुरू केली. त्यानंतर विविध घटकातील कर्मचाऱ्यांनाही लोकलमध्ये प्रवासाची परवानगी दिली. मात्र लोकलमधील प्रवाशांची सतत गर्दीच दिसून येत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यापूर्वीच रेल्वेने सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असताना तब्बल पाच महिन्यानंतर रेल्वे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी डब्यातील आसनांवर स्टिकर लावत असल्याचे दिसते आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल डब्यांमध्ये मंगळवारी प्रवाशांना अचानक आसनांवर स्टिकर दिसून आलेत. त्यावर कृपया इथे बसू नये अशा वाक्यांचे स्टिकरवर संदेश लिहिण्यात आले आहे. त्यामुळे काही डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी कमी असल्याने काही प्रवासी स्टिकर लावलेली जागा सोडून प्रवास करताना दिसून आले. तर काही डब्यांमध्ये मात्र, प्रवाशांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा नेहमीप्रमाणे दिसून आला आहे.

लोकल प्रवासातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वेने स्थानकांवर उद्घोषणा, फलक लावले आहे. मात्र, डब्यांमधील प्रवाशांची गर्दी कमी करण्यात आणि प्रवाशांना कोविड 19 च्या नियमांची अंमलबजावणी करण्यात मध्य रेल्वे अयशस्वी ठरली असल्याचे प्रवासी संघटना आरोप करत आहे. त्यानंतर आता दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत असल्याने, रेल्वे प्रशासन जागी झाल्याचे दिसते आहे. मात्र काही प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहे. काहींनी रेल्वेचा स्तुत्य उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

 मध्य रेल्वे मार्गावरील लोकल मध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्टिकर लावण्यात येत आहे. नुकतेच या प्रकारचा उपक्रम सुरू केला आहे. 
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
 
वाढत्या कोरोना बधितांच्या आकडेवारीमुळे लोकल मधील प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. एका प्रवाशाची जागा रिकामी सोडून बसत असल्याने प्रवाशांमध्ये वादविवादाच्या घटना घडल्या आहे. मात्र रेल्वेने स्टिकर लावल्यामुळे वादविवादाच्या घटना टळणार असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास मदत होणार आहे.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद

रेल्वे डब्यात लावण्यात आलेल्या स्टिकरचा आता, काहीच उपयोग होणार नाही. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता याचे काटेकोर पालन होणे शक्य नाही. त्याशिवाय प्रवासी ऐकणार नाही.
आशा डीसुजा, महिला संघटक, के3 रेल्वे प्रवासी संघटना

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Stickers with phrase Please don't sit here local coaches Railways effort social distance

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT