Stingray Fish  sakal
मुंबई

Uttan Beach : दोन भावांना सापडला चक्क 100 किलो वजनाचा ‘पाकट’मासा!

भाईंदर इथे असलेल्या उत्तन येथील भाटेबंदर समुद्र किनाऱ्यावर तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

खोल समुद्रातील मच्छीमारी बंद असल्याने अर्थिक विवंचनेत असलेल्या दोन कोळी भावांना निसर्गाने दिलासा दिला आहे. भाईंदर इथे असलेल्या उत्तन येथील भाटेबंदर समुद्र किनाऱ्यावर तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे. (Stingray Fish weighing 100 kg has been found on uttan beach mumbai )

हे ही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

भाटेबंदर किना-यावर नाखवा सुनील हे त्यांच्या भावासोबत मासेमारी करतात. त्यांची एकवीरा ही लहान बोट आहे. याबद्दल सुनील यांनी सांगितले की, आम्ही या छोट्या बोटीने समुद्र किनारी चिखलात रोज मासेमारी करतो. आम्हाला केवळ शिवंडाच मिळतात.पण, आज मासेमारीला बाहेर पडल्यावर एवढा मोठा मासा सापडेल असे वाटले नव्हते.

या माशाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने त्याला अधिक मागणी आहे. पण, हा मासा नशिबवान व्यक्तीलाच सापडतो. आम्हाला सापडलेल्या माशाचे वजन तब्बल 100 किलो इतके आहे. मुंबईच्या बाजारात व्यापाऱ्यांना तो विकला तर त्याची आम्हाला 15 हजार रुपये एवढी किंमत मिळू शकते, असेही सुनिल म्हणाले.

पाकट माशाला एवढी किंमत का ?

पाकट माशाच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळवितात. यातील यकृत तेलात अ आणि ड ही जीवनसत्त्वे असतात. शरीर तेलाचा उपयोग वंगण, खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो. त्यांच्या त्वचेपासून कमाविलेले कातडे विविध प्रकारे वापरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT