stir against onion export duty increase procurement centres maharashtra cm eknath shinde tells union government easkal
मुंबई

Onion : कांदा खरेदी केंद्रे वाढवावीत मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर याठिकाणी कांदा खरेदी केंद्रे सुरु केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्याच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु असताना केंद्र सरकार, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याकडून महाराष्ट्रात २ लाख टॅन कांदा खरेदी केली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली.

नाशिक, लासलगाव आणि अहमदनगर याठिकाणी कांदा खरेदी केंद्रे सुरु केली. मात्र या तेरा केंद्रांवर ५०० टन कांदा खरेदी होऊ शकल्यामुळे कांदा खरेदी केंद्रे वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

कांदा निर्यातीवर लावण्यात आलेल्या निर्यात शुल्कावर उतारा म्हणून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी सुरु करण्यात आली असली तरी ही केंद्रे अपुरी असल्यामुळे आज केवळ ५०० मेट्रिक टन खरेदी केली आहे.

ही खरेदी वाढविण्या साठी राज्य सरकारने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना पत्र लिहिले आहे सध्या राज्यात नाफेडच्या केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

कांद्याच्या वाढत्या द दरामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात तीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांच्या मध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे निर्यात शुल्क कमी करावे या मागणीसाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा केली.

त्यानंतर राज्यातील दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार नाफेड मार्फत राज्यात कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. राज्यात सध्या ४० लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे . नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवरून केंद्र सरकारला अपेक्षित असलेली खरेदी होण्याची शक्यता कमी असल्याने ही खरेदी केंद्र वाढवावीत अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारला पात्र पाठवून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT