stock market live sensex nifty hdfc bank hdfc share price nse bse target esakal
मुंबई

Mumbai : एचडीएफसी-बँकेच्या वजनामुळे शेअर निर्देशांक कोलमडले; सेन्सेक्स ६९४ अंश कोसळला

जागतिक शेअरनिर्देशांक तयार करणाऱ्या मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनलने त्यात एचडीएफसी बँकेच्या एकत्रित कंपनीला अर्धा एवढेच मानक दिले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एचएडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणानंतर निर्माण होणाऱ्या एकत्रित कंपनीचा जागतिक शेअर निर्देशांकात किती टक्के वाटा राहील यावरून उलटसुलट बातम्या आल्याच्या परिणामस्वरुप आज या दोनही शेअरची भारतीय शेअरबाजारात जोरदार विक्री झाली. त्यामुळे आज सेन्सेक्स ६९४.९६ अंश तर निफ्टी १८६.८० अंश कोलमडला.

जागतिक शेअरनिर्देशांक तयार करणाऱ्या मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनलने त्यात एचडीएफसी बँकेच्या एकत्रित कंपनीला अर्धा एवढेच मानक दिले. आधी हे मानक एक एवढे असेल अशी चर्चा होती. आता हे मानक निम्मे कमी झाल्यामुळे आज एचडीएफसी व एचडीएफसी बँक या दोनही कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली.

सध्या या दोनही कंपन्यांचे एनएसई व बीएसई मधील एकत्रित वजन अनुक्रमे साधारण १६ ते १८ टक्के एवढे आहे. या दोनही शेअरच्या किमतीत आज साडेपाच ते सहा टक्के घसरण झाल्याने शेअरबाजारही एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले.

आज दुपारी अकरा वाजेपर्यंत शेअरबाजार उच्चांकी स्तरावर होते, मात्र नंतर ही बातमी आल्यावर त्यात घसरण सुरु झाली. तरीही आज सेन्सेक्सने ६१ हजारांचा तर निफ्टीने १८ हजारांचा स्तर तोडला नाही. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६१,०५४.२९ अंशांवर तर निफ्टी १८,०६९ अंशांवर स्थिरावला.

आज बीएसई वर एचडीएफसी बँक ५.९० टक्के म्हणजे १०१ रुपये घसरून १,६२५ वर बंद झाला. तर एचडीएफसी चा शेअर ५.६३ टक्के (१६१ रु.) घसरून २,७०१ रुपयांवर बंद झाला. त्याखेरीज इंडसइंड बँक सव्वापाच टक्के घसरून १,०७४ वर स्थिरावला. टाटास्टील दोन टक्के तर महिंद्र आणि महिंद्र, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, एचसीएल टेक, कोटक बँक या शेअरचे भावही एक टक्का घसरले. तर दुसरीकडे टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, नेस्ले, आयटीसी, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो या शेअरचे भाव एक ते सव्वा टक्का वाढले.

दीड लाख कोटींचा फटका

आज एचडीएफसी-बँकेच्या शेअरबरोबर बँका, वित्तसंस्था, धातूनिर्मिती कंपन्या यांच्या शेअरमध्येही विक्री झाली. आजच्या पडझडीमुळे बीएसई वरील सर्व गुंतवणुकदारांच्या समभागांचे एकूण मूल्य १.४२ लाखकोटी रुपयांनी कमी झाले.

आजच्या पडझडीनंतरही फार घबराट उडाली नसून भारतीय शेअरबाजारांचा अंतर्गत कल वाढीचाच आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची आकडेवारी, मोठ्या कंपन्यांचे चांगले निकाल व परदेशी वित्तसंस्थांची खरेदी ही त्याची कारणे आहेत. गेल्या सहा दिवसांमध्ये परदेशी वित्तसंस्थांनी दहा हजार कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत. - सिद्धार्थ खेमका.

रुपये दोन पैसे वाढला

आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आज भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत दोन पैसे वाढून ८१.७८ वर बंद झाला. कच्च्या तेलाचे वाढते दर आणि आशियाई चलनांमधील घसरण यामुळे रुपयाला फार तेजी दाखवता आली नाही. आज रुपयाचे व्यवहार ८१.६८ वर सुरु झाले, दिवसभरात तो ८१.६५ पर्यंत वर गेला तर ८१.८४ पर्यंत खाली गेला. काल रुपया ८१.८० वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT