मुंबई

काळ्या मातीत फुलली लालेलाल स्ट्रॉबेरी 

सकाळ वृत्तसेवा

वाडा : आवंढे येथील आशीष समर्थ या तरुणाने चक्क स्ट्राबेरीचे उत्पादन घेऊन हे पीक वाड्यातही येऊ शकते, हे दाखवून दिले. वाडा तालुक्‍याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. कोलमला मागणी चांगली असली, तरी निसर्गाचा लहरीपणा, यांत्रिक उपकरणे, औषधे, बी-बियाणे, मनुष्यबळाचे वाढलेले दर लक्षात घेता आता भातशेती न परवडणारी झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी आता इतर पिकांचे उत्पादन घेताना दिसत आहे. 

वाड्यातील शेतकरी भातशेतीनंतर फळशेती, फुलशेती, भाजीपाला शेती, मत्स्यशेती, कुक्कुटपालन आदीकडे वळले आहेत. तालुक्‍यातील जमीन विविध पिकांस उपयुक्त असल्याने येथे कांदा, बटाटा, केळी, कोबी, फ्लॉवर, घोसाळे, वाल, पापडी, हळद, कांदा, आले, डांगर, तोंडली, गवार, पडवळ, घेवडा, चेरी, सफेद कांदा, लाल कांदा, वांगी आदी पिके घेत आहेत. नाशिककडे होणारी ही पिके आता काही प्रमाणात वाड्यातही येऊ लागली असून तालुक्‍यातील आवंढे येथील रुईया फार्ममध्ये आशीष समर्थ या तरुणाने चक्क स्ट्राबेरीचे उत्पादन यशस्वीरीत्या घेऊन हे पीक वाड्यातही येऊ शकते, हे दाखवून दिले आहे. 

ही बातमी वाचा ः मिरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा
सेंद्रीय शेतीवर भर 
आशीष समर्थ तरुण शेतकऱ्याने सात ते आठ गुंठे जागेत सात ते आठ हजार ट्रॉबेरीची रोपे लावली आहेत. संपूर्ण पिकाला ठिबक सिंचन केले आहे. डिसेंबर ते मार्चअखेरपर्यंत हे पीक चालणार आहे. येथील वातावरण स्ट्राबेरीला पोषक असल्याने हे पीक चांगले बहरले आहे. पिकाला शेणखत, गोमूत्र, जीवामृत, दशपाणी अर्क, गांडुळ खत अशी सेंद्रीय खते वापरण्यात आले आहे. एका झाडाला 80 ग्रॅम उत्पादन निघत असल्याचे आशीष समर्थ यांनी सांगितले. स्ट्रॉबेरीपासून जेली आणि जाम बनवता येतो, असे आशीष यांनी सांगितले. स्ट्राबेरीला गोडपणा, सुगंधी व आंबटपणा असल्याने ही फळे महाबळेश्वरपेक्षाही अधिक चवीला रुचकर असल्याचे आशीष समर्थ यांचे म्हणणे आहे. 


वाडा तालुक्‍याची शेती ही विविध पिकास उपयुक्त असल्याने देशी पिकांबरोबरच ब्रोकोली, चायनीज, झुकीनी ही विदेशी पिकेही येथे उत्तम पद्धतीने येऊ शकतात. स्ट्राबेरी हे पीक आम्ही गेल्या पाच वर्षांपासून घेत असून ते वाड्याच्या मातीत उत्तम पद्धतीने येते. महाबळेश्वरपेक्षाही चवीला जास्त रुचकर असल्याचे मला वाटते. 
- आशीष समर्थ, शेतकरी, रुईया फार्म हाऊस, आवंढे 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT