stray dog attacked four year old girl ulhasnagar Immunoglobulin injections not available in government hospital mumbai sakal
मुंबई

उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने लचके तोडलेल्या चिमुकलीची इंजेक्शन साठी 7 तास भटकंती

शासकीय रुग्णालयात इमिनोग्लोबिन इंजेक्शने नसल्याचे उघड, प्रकरणाची चौकशी होणार

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : एका चार वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यावर उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात इमिनोग्लोबिन हे परिणामकारक इंजेक्शन नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे या इंजेक्शनसाठी चिमुकलीला सोबत घेऊन तब्बल सात तास भटकंती करण्याची वेळ तिच्या आईवडिलांवर आली आहे.याप्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भावना तेलंग यांनी दिली. कॅम्प नंबर 4 मध्ये असलेल्या सुभाष टेकडी परिसरातील नालंदा शाळेजवळ सुरेश शेळके हे कुटुंबा सोबत राहतात.त्यांची 4 वर्षीय मुलगी आरोही ही आंघोळ करून घराच्या बाहेर बसली असता भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला करून तिच्या पायाचे लचके तोडले.ती किंचाळल्यावर तिचे आईवडील घराबाहेर आले.

त्यांनी तिला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेल्यावर तिला रेबिजचे इंजेक्शन देण्यात आले.काही तास बसवून ठेवण्यात आले.वय लहान आणि जखमा मोठया असल्याने तिला परिणामकारक इमिनोग्लोबिन हे इंजेक्शन देणे आवश्यक होते.मात्र ही इंजेक्शने उपलब्ध नसल्याने तिला कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले.सुरेश शेळके हे त्यांची मुलगी आरोही हिला लोकलने कळव्याला घेऊन गेले.पण तिथेही हे इंजेक्शन नसल्याने शेळके तिला मुंबईला घेऊन गेले.तिथे तिला इंजेक्शन देण्यात आले.

यासंदर्भात रुग्णालयाच्या प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भावना तेलंग यांच्याशी संपर्क साधला असता इमिनोग्लोबिन इंजेक्शने शासनाकडून पाठवण्यात येतात.ती संपण्यापूर्वीच इंजेक्शनसाठी पाठपुरावा करण्यात येतो.मुलीला रेबिजची इंजेक्शने देणारे डॉक्टर नवीन आहे.त्यांनी तिला बसवून ठेवले होते की नाही याची चौकशी करण्यात येणार असल्याचे डॉ.तेलंग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT