Varsha Gaikwad Statement  sakal media
मुंबई

"आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कारवाई"

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. याबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी आज विधान परिषदेत दिली. शिक्षक आमदार नागो गाणार (Nago Ganar) व आमदार निरंजन डावखरे (Niranjan davkhare) यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे नाव संच मान्यतेच्या संख्या अहवालात गाळली जात असल्याची बाब प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केली होती.

आमदार गाणार यांनी यावेळी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृह समोर मांडली. शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना तंबी देतात की, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव शिक्षण विभागाच्या यादीत पाठवू नका. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव हजेरी पटावरून कमी करा, असे सांगितले जाते. त्यावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले.

आधार कार्ड नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. जे शिक्षणाधिकारी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशी माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांना ते काढून घेण्यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT